Loading

Maza Dhangarwada

माझा धनगरवाडा

Author : Dhananjay Dhargude (धनंजय धरगुडे)

Price: 400  ₹360

Discount: 10%

Avilability: In stock

ISBN : 9789386493224
Publisher : Rohan Prakashan
Published on : 2017
Binding type : Paperback
Edition : 1
Language : Marathi
Rating :

शेळ्या-मेंढ्यांसोबत आपला कुटुंबकबिला घेऊन पोटासाठी रानोमाळ भटकणारा एक धनगर आपल्या पोरांना शिकवायचं असा निश्चय करतो, आणि बापाचं हे स्वप्न उराशी घेऊन धनगरवाड्यातलं एक कोकरू बिचकत बिचकत शाळेत जाऊ लागतं... वादळवारा असो, वा सतत बदलणारा मुक्काम असो, काबाडकष्ट करून ते आपलं शालेय शिक्षण पूर्ण करतं. नंतर शहरामध्ये जाऊन उच्च शिक्षण घेतं. शिक्षणासाठी प्रसंगी मोलमजुरी करून ‘बापाचं स्वप्न पूर्ण करायचंच’ असा निर्धार करतं आणि स्वत:च स्वत:ला प्रेरित करत राहतं! आत्मभान जागृत झालेल्या एका धनगराचं हे विलक्षण आत्मकथन... या कथनात लेखक धनंजय धुरगुडे धनगर समाजाच्या रूढी-चालीरीती आणि जीवनपद्धती यांचं जिवंत चित्रण करतात. त्यांचे पारंपरिक धनगरी खेळ, गजीनृत्य व सण-उत्सव यांचं शब्दचित्र रेखाटतात, आणि शिक्षणामुळे झालेला आपला विकास सांगत धनगर समाजाचं वास्तववादी दर्शन घडवतात. एका धनगराने अस्सल धनगरी शैलीत प्रथमच चितारलेला हा – माझा धनगरवाडा!

Be the first to review


Add a review