Avilability: In stock
कुठल्याही विषयाचा अभ्यास करत असताना त्या विषयातील मूळ संकल्पना, विचार यांची तोंडओळख तरी असणे आवश्यक असते. माध्यम अभ्यासातील मूळ संकल्पना, सिद्धान्त यांची येथे ओळख तर करून दिली आहेच, त्याचबरोबर अधिक माहितीसाठी संदर्भही दिले आहेत. येथे दिलेले शब्द, संकल्पना, सिद्धान्त माध्यम आणि संज्ञापन अभ्यासातील आहेत व यांवर जगभरात भरपूर संशोधन झालेले आहे. यांतील प्रत्येक संकल्पनेचा मागोवा घ्यायचे म्हटले तर तर त्यावर अनेक जण पी.एचडी. करतील. हे पुस्तक तरुण संशोधक, माध्यम अभ्यासक व पत्रकारांना उपयोगी पडेल. त्याचबरोबर ज्यांना माध्यम व संज्ञापन व्यवस्था व प्रक्रिया यांचे कौतुक व कुतूहल असेल त्यांनाही उपयोगी पडेल.