Avilability: In stock
भारतीय इतिहासातील सर्वाधिक प्रभावी व्यक्तिमत्त्वांपैकी एक. या व्यक्तिमत्त्वावर आजवर विपुल लेखन, तसेच ग्रंथर्नििमती झाली आहे. परंतु या पुस्तकात भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या आणि जगाला सदसद्विवेकाचा मार्ग दर्शवणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाबद्दलच्या अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला आहे – गांधींचे दैनंदिन आयुष्य व जवळच्या लोकांशी नातेसंबंध कसे होते? त्यांनी इंग्रजी सत्तेशी, फूट पडलेल्या त्यांच्याच लोकांशी, त्यांच्या शत्रूशी आणि अगदी स्वत:शीही कसा सामना केला?... आणि हे करताना अतिप्रसिद्धी, मिथक-कथा आणि आख्यायिका यांच्या वलयामध्ये अडकलेल्या खऱ्या गांधींना या पुस्तकातून जगासमोर मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, गांधीजींचे नातू असूनही लेखक राजमोहन गांधी यांनी वस्तुनिष्ठपणे सखोल संशोधन करून हे चरित्र लिहिले आहे. हे चित्रण युरोपीय साम्राज्य आणि आशियातील एक राष्ट्र यांच्यातील संवादाचा महान इतिहास आहेच, पण त्यात वर्तमानकाळातल्या मुद्द्यांबद्दलही भाष्य आहे. दहशतवाद, युद्धे यांमुळे जगभरात होत असलेल्या हिंसेच्या पाश्र्वभूमीवर, मुस्लीम आणि इतर धर्मीय यांच्यात समेट घडवण्यासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या गांधींची ही चरितकहाणी महत्त्वपूर्ण ठरते.