Loading

Striyanchya Niyatkalikancha Itihas

स्त्रियांच्या नियतकालिकांचा इतिहास

Author : Dr. Swati Karve (डॉ. स्वाती कर्वे)

Price: 350  ₹280

Discount: 20%

Avilability: In stock

ISBN : 9789386401083
Publisher : Diamond Publications
Published on : 2017
Binding type : Paperback
Edition : 1
Language : Marathi
Rating :

एकोणिसावं शतक स्त्री-भान, स्त्री-जाणिवा सर्वार्थानं सजग होण्यात उल्लेखनीय स्थित्यंतर घेऊन आलं. सार्वजनिक अवकाशात अनेकानेक माध्यमांतून स्त्रियांच्या विचारजाणिवा प्रखरतेनं अभिव्यक्त होण्याचा हा काळ होता. याला मोलाची साथ मिळाली ती स्त्री-विषयक नियतकालिकांची. कैक काळ थोपवलेली, दडपलेली, दबून राहिलेली स्त्रियांच्या भावविश्वातली स्पंदनं, शब्द नि लेखणीतून या नियतकालिकांमधून असोशीनं व्यक्त होऊ लागली. या अर्थी स्त्रियांचं समाज-सांस्कृतिक तथा राजकीय विचारभान व्यापक करण्यात, स्त्री विकासाची बिजं भवतालात रुजवण्यात ती मदतगार ठरली. स्त्री प्रबोधनाची धुरा जोपासण्यात, दृढमूल करण्यातही त्यांचा लक्षणीय वाटा आहे. १८५५ मध्ये प्रथमतः सुरू झालेलं ‘सुमित्र’ ते आजघडीचं ‘मिळून सार्याजणी’, ‘माहेर’, ‘मानिनी’, ‘प्रपंच’, ‘बहिणा’ असा हा प्रदीर्घ प्रवास रेखता येतो. या सर्व ज्ञात-अज्ञात नियतकालिकांचा खोलवर धांडोळा प्रस्तुत ग्रंथामधून डॉ. स्वाती कर्वे यांनी घेतला आहे. स्त्रियांच्या नियतकालिकांचं ऐतिहासिक दस्तऐवजीकरणच त्यांनी साकार केलं आहे. स्त्री-अभ्यासातही यामुळे मौलिक भर पडलेली आहे.

Be the first to review


Add a review