Avilability: In stock
शिवप्रभुंच्या चतुर आणि चाणाक्ष नजरेत भरलेले हंबीरराव हे स्वराज्याचे सरलष्कर झाले आणि महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात पंतप्रधान आणि युवराजांच्या श्रेणीत विराजमान झाले. तळबीडच्या पाटील-देशमुख घराण्यातील शौर्याची परंपरा लाभलेले हंबीरराव एक अस्सल हिरा म्हणून महाराजांच्या राजमुकुटात शोभायमान झाले. ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहून औरंगजेबाच्या आक्रमणास सहस्रार्जुनाप्रमाणे थोपवून धरण्यासाठी ते सात वर्षे शंभू राजांसमवेत रणभूमीवर झुंजले आणि त्यातच त्यांना वीरमरण आले! संभाजीराजांच्या जिरेटोपातील ते सुवर्णालंकार तर होतेच, पण त्यांच्या बाहुतील रसरसता स्नायू आणि हृदयातील धमनीचा अंत:पटलसुद्धा होते. सेनापती हंबीरराव मोहिते यांचे पहिलेवहिले समग्र चरित्र प्रत्येक मराठी वाचकाने जरूर वाचावे.