Avilability: In stock
छत्रपति शिवाजी महाराज हे आम मराठी जनतेचे आराध्यदैवत आहे. तेव्हा महाराजांची जेवढी चरित्रे प्रकाशित होतील तेवढी हवीच आहेत. परंतु दुर्दैवाने अद्यापहि मराठी भाषेतील शिवचरित्रांची संख्या फारच थोडी आहे. आम्ही प्रकाशित करीत असलेल्या या शिवचरित्राने त्यात एकाची भर पडत आहेच. शिवाय, खर्या इतिहास-संशोधकाला साजेश्या तटस्थ वृत्तीने लिहिलेले हे एक नमुनेदार शिवचरित्र होय. लेखकाने तथाकथित ‘संशोधनात्मक स्वातंत्र्य’ न घेतल्यामुळे या शिवचरित्राला कपोलकल्पित कादंबरीचे स्वरूप न येता, हा एक विश्वसनीय ग्रंथराज झालेला आहे. तसेच, हे एका इतिहास-संशोधकाने लिहिलेले साधार शिवचरित्र असले तरी ते केवळ संशोधकांसाठी लिहिलेले आहे असे मात्र नाही. कोणाहि सामान्य वाचकाला सहज समजूं शकेल अशा भाषेत ते लिहिलेले आहे आणि म्हणूनच अनेक वृत्तपत्रांनी त्याचे भरपूर कौतुकहि केले आहे. गेली अनेक वर्ष मागणी असूनहि हे चरित्र बाजारात उपलब्ध नव्हते. वाचक त्याच्या या नव्या आवृत्तीचे पूर्वीप्रमाणेच स्वागत करतील अशी खात्री आहे.