Avilability: In stock
बाबुराव बागूल यांच्या ‘विद्रोह’ या कथेच्या पाश्र्वभूमीवर सिद्धार्थ देवधेकर यांच्या कथा ठेवून पाहिल्यास त्यांचं वेगळेपण निराळ्या पद्धतीने सिद्ध होतं. बाबुरावांचा नायक हा शंभरातला एक ठरू शकणारा विद्रोहाचा मूर्तिमंत पुतळा होता तर देवधेकरांच्या कथांचे नायक हे शंभरातल्या नव्याण्णवांप्रमाणे अगतिक, हतबल आणि बंडाचा विचार स्वप्नातही करू न शकणारे सर्वसामान्य आहेत.