Avilability: In stock
आजकाल मॅच फिक्सिंगबद्दल बरंच बोललं जातं. विज्ञान तंत्रज्ञानाची प्रगती पाहता रोबॉट फिक्सिंगचे दिवसही लांब नाहीत, हे आपल्या लक्षात यायला हवं. घाटे यांच्या विज्ञानकथांना बराच मोठा वाचकवर्ग लाभलेला आहे. मध्यंतरी विज्ञानविषयकलेख लिहिताना त्यांनी विज्ञानकथांकडे दुर्लक्ष केलं की काय, असं वाटू लागलं होतं; पण हा नवा विज्ञानकथासंग्रह घाटे यांनी विज्ञानकथा लेखनाकडे दुर्लक्ष केले नाही, हे सिद्ध करेल. रोबॉट, म्हणजे यंत्रमानव हा तर घाटे यांचा आवडता आणि हातखंडा विषय; पण या कथासंग्रहात ‘रोबॉट फिक्सिंग’शिवाय इतर यंत्रमानवी कथांबरोबर यंत्रमानवरहित विज्ञानकथाही आढळतील. घाटे यांच्या वाचकांची या कथा निश्चितच निराशा करणार नाहीत, याची खात्री देता येते.