Avilability: In stock
आनंदाच्या गोष्टी सांगणारे हजारो असतात, पण आपल्या व्यथा सांगणारे कोणी नसते. या सेवाभावींनी या अशा व्यथा जाणून घेतल्या आणि त्यांचे अश्रू पुसले, हे खर्या अर्थाने परमेश्वराचे काम आहे. सेवाभावी कार्य करताना प्रत्ययी जाणवणार्या वेदनांच्या महासागरापुढे रामायण, महाभारत आणि गीताही तोकड्या ठराव्यात. माझ्या दृष्टीने ‘लोकसत्ता’चा ‘सर्वकार्येषु सर्वदा’ हा उपक्रम अनामिक कार्याचा सत्कार आहे. - सदाशिव अमरापूरकर सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांना प्रसिद्धीची गरज वाटत नाही. मनापासून केलेल्या कामाच्या बाबतीत असंच घडतं. अशा दहा संस्था, त्यांची माणसं मला भेटली; हे असे आदर्श आपल्यापुढे आहेत. काय लागतं आपल्याला? ङ्गक्त एक ट्रिगर लागतो. अशी किती ट्रिगर्स आहेत आपल्याकडे? किती ‘आदर्श’ आहेत आपल्याकडे...? इतकं पराकोटीचं कार्य करणार्या या संस्थांची दखल एखाद्या वृत्तपत्राने घेणं, ही खूप मोठी गोष्ट आहे. - नाना पाटेकर