Avilability: In stock
या पुस्तकात संस्थात्मक नसलेल्या परंतु एकत्रितपणे केलेल्या कृतींचा अभ्यास, या कृती राजकीय व सामाजिक बदलाचे माध्यम म्हणून कसे काम करतात, हे बघण्यासाठी केलेला आहे. शिवाय राजकीय प्रक्रियेत निर्णायक ताकद म्हणून कार्य करणार्या राजकीय चळवळींचा अभ्यासही या पुस्तकात आहे. - चळवळ का होते ? - चळवळीतील मुख्य घटक कोणते ? - वेगवेगळ्या प्रकारे केलेल्या सामुहिक कृतीला शासन कसा प्रतिसाद देते ? याचा अभ्यास आहे. भारतातील वाढत्या असंतोषाचे कारण आम जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यात संस्थात्मक पद्धतीला आलेले अपयश या गोष्टींचा अभ्यास आहे. पुस्तकाच्या दुसर्या भागात निषेध मोर्चे, आंदोलने, संप, दंगली अशा वेगवेगळ्या प्रकारांनी सामाजिक गटांनी केलेल्या सामुहिक कृतींचे पुढे सामाजिक चळवळीत कसे रुपांतर झाले, त्याचा अभ्यास आहे. जमीन कसणारे, शेतकरी, आदिवासी, स्त्रिया, विद्यार्थी यांनी वेळोवेळी केलेल्या चळवळींची सुरुवात व त्यांचा झालेला प्रसार या सगळ्यांचा लेखाजोखा येथे आहे. तसेच वसाहतींच्या काळात व स्वातंत्र्य प्राप्तीनंतर धार्मिक, पर्यावरणवादी चळवळी झाल्या त्यांचा अभ्यास देखील यात केलेला आहे. एक अटकळ ठेऊन व्यापक दृष्टिकोनाने या पुस्तकात जो विविध गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे त्यामुळे हे पुस्तक सामाजिक बदल घडवून आणण्यात गुंतलेली मंडळी, प्रत्यक्ष चळवळ करणारे तसेच वेगवेगळ्या वादविवादांचे अभ्यासक, राज्यशास्त्र, समाजशास्त्राचे अभ्यासक या सगळ्यांसाठी पुस्तकांतील लेखांचे वाचन अनिवार्य आहेच परंतु चालू काळातील इतिहासाचे अभ्यासक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते या मंडळींना हे पुस्तक फार मोलाचे वाटेल शिवाय राज्यशास्त्र, समाजशास्त्राच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना हे पुस्तक फार महत्त्वाचे वाटेल यात शंका नाही.