Avilability: In stock
जगातलं सगळं विज्ञान, कला अन् शास्त्रं अखेरीस माणूसशास्त्रापुढे विनम्र असतात. शेवटी हातचा एक उरतो तो माणूसच. हे पुस्तक माणसांचं आहे. तऱ्हेवाईक, प्रामाणिक माणसं. मानी, दिलदार, लहरी...अन् तालेवार, गुणी माणसं. माणुसकीपर्यंत पोहोचण्यासाठी नित्य धडपडणारी माणसं. प्रत्येकाच्या जगण्याला आत्मभानाचा उग्रमधुर सुवास... माणसं एकाच मापा-आकाराची नसतात. इथंही तशी ती नाहीत. महात्मा गांधी, माजी पंतप्रधान मोरारजी देसाई, विख्यात पत्रकार-संपादक रुसी करंजिया, 'फिअरलेस' नादिया, कथाकार इस्मत चुगताई, गीतकार-कवी शैलेंद्र, संगीतकार मदनमोहन, सर लॉरेंस ओलिव्हिए-विवियन ली यांसारखे मनस्वी प्रतिभावान इथं आहेत. त्याचप्रमाणे काही साधी माणसंदेखील आहेत. गवताच्या पात्याप्रमाणे लवलवणारी. अज्ञात, अयाचित, आनंदी अन् अवध्य. या माणसांचा अंतर्वेध घेताना, त्यांच्या जगण्यातलं सत्त्व-तत्त्व 'मनें मौआलें' वेचताना लेखकाची वृत्ती तटस्थ अन् संवेदनशील आहे. लिखाणातला मैत्रीचा सूर सच्चा अन् संथखोल आहे.