Avilability: In stock
जगातील सर्वांत बलवान पुरुष असो की सर्वांत बुद्धिमान पुरुष असो – तो एका स्त्रीच्या पोटीच जन्म घेतो. इतिहास असंही सांगतो की, स्त्रीनंच शोधली शेती, स्त्रीनंच साधली प्रगती. स्त्रीनंच घडवली संस्कृती आणि स्त्रीनंच घडवला पुरुष! मग हा पुरुषच तिचा ‘शत्रू’ कसा झाला? स्त्रीला कनिष्ठ, दुय्यम लेखून स्वातंत्र्य तिचं हिरावून घेऊन, तिच्यावरच अत्याचार का करू लागला? स्त्री आणि पुरुष यांच्यात नैसर्गिक भेद होतेच. त्या भेदांनीच का हा कावा साधला? भेद तर आहेतच... पण भेद आहेत म्हणून तर आकर्षण आहे, स्त्री-पुरुष मीलनातूनच हे जीवन उमलत असतं. म्हणूनच परस्परांवाचून दोघांचंही अस्तित्व – अधुरंच नव्हे, अशक्य आहे! शिवाय... ‘नर आणि मादी’ यांखेरीजही स्त्री-पुरुष नात्याचे किती लोभस फुलोरे आहेत. स्त्रियांना ‘मुक्ती’ हवी असली, तरी पुरुषविरहित जगात का राहायचं आहे? स्त्रीविरहित जगाची कल्पना पुरुषांनाही अशक्य आहे. मग तरीही ‘स्त्री विरुद्ध पुरुष’ हा संघर्ष कशासाठी? खरंच का हा संघर्ष अटळ आहे? हे पुस्तक, अशा अनेक प्रश्नांवर विचार करण्यासाठी तुम्हांला निश्चित उद्युक्त करील. आणि होय, पुस्तक वाचण्यापूर्वीचे तुम्ही आणि वाचल्यानंतरचे तुम्ही ‘सारखे’ नसाल...