Avilability: Out of stock
आजच्या जागतिकीकरणाच्या उलथापालथीत सकस मन घडवण्यासाठी 'मनाच्या श्लोकां'ची नितांत गरज आहे. हल्ली शाळाशाळांमधून मूल्यशिक्षणाचे तास सुरू झाले आहेत. त्यासाठीदेखील 'मनाचे श्लोक' उपयुक्त ठरण्यासारखे आहेत. मनाला बोध करण्यासाठी समर्थ रामदासांनी संवादाचे माध्यम निवडले. हा संवाद त्यांनी मनाच्या प्रत्येक श्लोकातून केला. कधी मनाला आंजारून-गोंजारून, तर कधी मनाला दटावून; कधी मनाला थापटून-थोपटून, तर कधी मनाला समजावून... समर्थांनी मनाशी सुसंवाद साधायचा सत्त्वसंपन्न प्रयत्न केला. मनाला चांगल्या गोष्टींकडे वळवण्यासाठी समर्थांनी या श्लोकांतून काही साध्या-सोप्या युक्त्यासुध्दा सांगितल्या. समर्थांच्या त्या संस्कारांचे सारसंचित नव्या संदर्भात उलगडून दाखवणारे हे भावचिंतन...