Avilability: In stock
सध्या शिक्षणप्रक्रियेअंतर्गत तरुण पिढीचा बौद्धिक विकास साधून त्यांना तयार करण्यात आम्ही व्यस्त आहोत. भावनिक विकासाकडे दुर्लक्ष करून सार्वजनिक परीक्षेचे प्राबल्य व स्पर्धात्मक वृत्ती वाढत आहे. हात व मेंदू यांना शिक्षण मिळत आहे. पण हृदयाला शिक्षण मिळत नाही. हिंसाचार, अत्याचार, दहशतवाद, पर्यावरणाचा असमतोल या सर्वांच्यामागे नैतिक शिक्षणाचा अभाव, मूल्य रुजवणुकीची कमतरता हे एक कारण आहे. त्यामुळेच समाजव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात होऊ घातलेल्या नैतिक मूल्यांच्या घसरणीच्या संदर्भातून चिंता करायला लावणार्या या विषयावर विविध अंगाने दृष्टिक्षेप टाकण्याचा प्रयत्न या ग्रंथाद्वारे करण्यात आला आहे.