Avilability: In stock
कृषी भूगोल व भारतीय शेती या विषयावरील हे संदर्भ पुस्तक; शेतीचा भौगोलिक, अर्थशास्त्रीय व समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करावयास प्रवृत्त करणारे असे आहे. जगात शेतीचा प्रारंभ व प्रसार कसा होत गेला अशा विषयापासून ते भूमी क्षमतामापन, कृषी कार्यक्षमतामापन, कृषी उत्पादकता, पोषण व भूक समस्या, अन्नसुरक्षा, भूमिहिन श्रमिक, महिला व बालके यांची स्थिती, पर्यावरण र्हास व शेती आणि शेतकर्यांचे आरोग्य अशा भारतीय शेतीच्या वर्तमान चर्चा विश्वापर्यंत या पुस्तकात सहजसोप्या भाषेत लेखिकेने ऊहापोह केला आहे. मराठी माध्यमातून उच्च शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना, स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्या तरुण वर्गास व शिक्षणक्षेत्रातील इतर संबंधितांना हे पुस्तक निश्चितच उपयुक्त आहे. या पुस्तकाचे आंतरविद्याशाखीय स्वरूप विशेष उल्लेखनीय आहे. लेखिकेला विषय शिकविण्याचा आणि पाठ्यपुस्तके, लेख लिहिण्याचा दीर्घ अनुभव असल्याची प्रचिती या पुस्तकातील लिखाणातून येते. आकृत्या, आलेख, संख्याशास्त्रीय तक्ते व नकाशे; तसेच शब्दार्थसूची व विषयसूची दिल्याने विषय समजण्यास सुलभ झाला आहे. एक चांगले आंतरविद्याशाखीय स्वरूप असलेले संदर्भ पुस्तक म्हणून त्याचे योगदान महत्त्वाचे आहे.