Avilability: Out of stock
जे. आर. आर. टॉल्कीन यांच्या ‘स्वामी मुद्रिकांचा’ (The Lord of the Rings) या महाकादंबरीचा ‘मुद्रिकेचे साथीदार’ हा पहिला भाग आहे. कृष्णशक्तीचा स्वामी सॉरॉन याने शक्तिमान मुद्रिका मिळवल्या आहेत. या मुद्रिकांच्या जोरावर तो मध्य-वसुंधरेवर अधिराज्य गाजवू इच्छितो. या सर्व मुद्रिकांवर अंमल असलेली सर्वशक्तिमान मुद्रिका मात्र त्याच्याकडे नाही. ती बिल्बो बॅगिन्स नावाच्या हॉबिटला गवसली आहे. शायरमधील एका सुस्त गावात, म्हातार्या बिल्बोचा तरुण पुतण्या फ्रोडो बॅगिन्स याच्या समोर एक मोठी कामगिरी उभी राहिली आहे. बिल्बोने ती मुद्रिका त्याच्याकडे सुपुर्द केली आहे. स्वतःचं घर सोडून फ्रोडोला मध्य-वसुंधरेच्या भूप्रदेशांमधून विपदांनी भरलेल्या वाटा धुंडाळत अंतःपर्वताच्या टोकावरच्या अग्निरसाच्या खाईपर्यंत जाणं भाग आहे. तिथे जाऊन ती मुद्रिका नष्ट केल्यावरच कृष्णशक्तीच्या स्वामीचा पाडाव होणार आहे.