Avilability: In stock
‘त्याने भल्यांशी भलाईनं वागावं आणि टग्यांना अद्दल घडवावी... धिक्कार करणार्यांच्या झुंडी आल्या, तर कानाडोळा करायला शिकवा त्याला आणि ठसवा त्याच्या मनावर सत्य आणि न्यायासाठी पाय रोवून लढत राहण्याचं महत्त्व.’ अमेरिकेतून गुलामगिरी निपटून काढणार्या अब्राहम लिंकनचे हे उद्गार इतिहासात अजरामर झाले आहेत. त्याचं संपूर्ण आयुष्य आणि मृत्यूसुद्धा ‘सर्व माणसं समान आहेत’ या ध्यासालाच वाहिलेला होता. याच अब्राहम लिंकनचं अतिशय प्रेरक चरित्र आणि त्याचा झगडा या पुस्तकातून आपल्यासमोर उलगडणार आहे. तसंच सर्वसामान्यांचा नेता, कुशल राजकारणी आणि चतुर राष्ट्राध्यक्ष म्हणूनही तो आपल्याला या पुस्तकात जागोजागी भेटणार आहे.