Avilability: In stock
नेहमीप्रमाणे गणिताचा तास सुरू होता आणि सर भागाकार शिकवत होते. ‘‘तीन फळं तीन जणांमध्ये वाटली, तर प्रत्येकाला एक फळ मिळतं. म्हणजेच एखाद्या संख्येला त्याच संख्येने भागलं, तर उत्तर एक येतं.’’ त्या वेळी वर्गातल्या एका बुजर्या मुलाने विचारलं, ‘‘शून्याला शून्याने भागलं, म्हणजे कुठलंच फळ कुणामध्येच वाटलं नाही, तरी उत्तर एक येणार का?’’ या प्रश्नाने वर्गात सगळीकडे शांतता पसरली. वर्गातला हा बुजरा मुलगा म्हणजे प्रसिद्ध गणिती रामानुजन. लहान वयापासूनच गणिताने झपाटून गेलेल्या या थोर गणितीचं प्रेरणादायी चरित्र या पुस्तकातून आपल्यासमोर येणार आहे. तसंच संपूर्ण जगात मान्यता मिळवण्यासाठीचा त्याचा अतोनात संघर्ष आणि शेवटच्या श्वासापर्यंत कायम राहिलेल्या गणिताच्या अनोख्या प्रतिभेचं दर्शनही या पुस्तकातून आपल्याला होणार आहे.