Avilability: In stock
पुरू-ययाति या पौराणिक कथेला आजच्या सामाजिक चौकटीत बसवून लिहिलेली कादंबरी म्हणजे ‘ययाति पुरू’. स्त्रीचं निर्भीडपण, मोकळेपण या कादंबरीतल्या व्यक्तिरेखांतून वाचकांपुढे जिवंत होत जातं. मूळ कन्नड भाषेप्रमाणेच तिचा ओघही प्रचंड आहे. स्त्री-पुरुष संबंधांचं कादंबरीतलं मोकळंढाकळं चित्र लक्षवेधी ठरतं, पण म्हणून ती कुठेही स्वैर होत नाही. चौकटीबाहेरची अनेक नाती दाखवताना व्यक्तिमत्त्वातल्या अनेक भुसभुशीत जागा लेखिका सहज उघड करत जाते. मात्र तरीही कादंबरी बटबटीत होत नाही. ही मूळ कादंबरी दमयंती नरेगल यांची असून अतिशय प्रतिष्ठेचा ‘मास्ती पुरस्कार’ या कादंबरीला प्राप्त झाला आहे. गिरीश कार्नाडांच्या ‘ययाति’ या नाटकाच्या प्रेरणेतून ही अभिजात कादंबरी साकारली आहे आणि पारंपरिक कथेच्या चौकटीमुळे ती खास पंसतीसही उतरते.