Avilability: In stock
भारतीय घटनेच्या कायद्याचा अभ्यास करणार्या जगातल्या अग्रगण्य तज्ज्ञांपैकी एक नाव म्हणजे ग्रॅनव्हिल ऑस्टिन. मूळ स्रोतांचा आधार घेऊन लिहिलेल्या ‘भारतीय राज्यघटना’ या अभिजात संदर्भग्रंथामध्ये ऑस्टिन घटनाकारांच्या ध्येयांचे, प्रेरणांचे आणि दृष्टिकोनांचे परीक्षण करतात. आवश्यक शासनप्रणालींची रचना करण्यात आणि भारताची उद्दिष्टे स्पष्टपणे मांडण्यात घटनाकार किती क्षमतेपर्यंत यशस्वी झाले आहेत, याची ऑस्टिन चिकित्सा करतात. प्रस्तुत घटना सामाजिकदृष्ट्या क्रांतिप्रवण आणि आधुनिकीकरणासाठी ऊर्जास्रोत ठरल्याचे या पुस्तकाद्वारे आपल्या निदर्शनास येते. घटनेच्या तत्त्वांमध्येच वर्तमानातील आणि भविष्यातील समस्यांच्या समाधानाची बीजे सापडू शकतील, आणि घटना निरुपयोगी ठरली आहे असे म्हणणे म्हणजे दिशाभूल ठरेल, असे लेखकाचे प्रतिपादन आहे. हा संदर्भग्रंथ कायदेतज्ज्ञांसाठी, कायद्याच्या अभ्यासकांसाठी आणि राज्यशास्त्र तसेच समकालीन भारताच्या जडणघडणीत स्वारस्य असणार्यांसाठी अत्यावश्यक आहे. वॉशिंग्टन डीसीमध्ये वास्तव्य असलेले ग्रॅनव्हिल ऑस्टिन हे एक प्रतिभावान इतिहासकार आहेत. ‘वर्किंग अ डेमोक्रेटिक कॉन्स्टिट्यूशन : अ हिस्ट्री ऑङ्ग द इंडियन एक्स्पीरिअन्स’ हे पुस्तकही त्यांच्या नावावर जमा आहे. ‘कामाचा आवाका आणि त्यानुरूप उचित विषयाची मांडणी प्रभावी ठरते. लेखनशैलीतील स्पष्टता वाखाणण्याजोगी आहे.’ - द इकॉनमिस्ट ‘प्रस्तुत पुस्तक म्हणजे अत्यंत वाचनीय आणि सखोल ठरेल असा भारतीय राज्यघटनेचा लेखाजोखा.... राजकीय इतिहासाचा एक उत्तम नमुना’ - जर्नल ऑङ्ग एशियन स्टडीज ‘थोर अभ्यास.... जगातला एक मोठा आणि दीर्घकालीन घटनात्मक दस्तऐवज निर्माण करणारी आणि निरंतर कष्टप्रद, पण संमोहित करणार्या प्रक्रियेची अभिजात चिकित्सा म्हणून हा अभ्यास पुढे येतो.’ - पब्लिक लॉ ‘आपल्या राज्यघटनेच्या जडणघडणीचा अतिशय प्रभावी अभ्यास’ - द बुक रिव्ह्यू