Avilability: In stock
आगाखान पॅलेस येथील कस्तुरबा व महादेवभाईंची समाधी व गांधीजींच्या वास्तव्याने पुनित झालेली भूमी यांच्या जतनासाठी गांधी राष्ट्रीय स्मारक समितीची स्थापना १ मे १९७७ रोजी मणी भवन, मुंबई येथे पूज्य विनोबाजींच्या प्रेरणेने झाली. ९ ऑगस्ट १९४२ला झालेल्या ‘छोडो भारत’ आंदोलनातील धरपकडीनंतर महात्मा गांधी, कस्तुरबा व स्वातंत्र्य चळवळीतील अनेक नेत्यांना आगाखान पॅलेसमध्ये बंदी म्हणून ठेवले होते. कस्तुरबा व महादेवभाईंचे येथे निधन झाले. येथून मुक्त होऊन निघण्यापूर्वी गांधीजींनी तीन गोष्टी सांगितल्या- १. महादेव आणि कस्तुरबा यांच्या समाधी येथे असल्यामुळे हे ठिकाण स्वतंत्र भारतातील तीर्थक्षेत्र बनेल. २. मी आगाखान यांना हा पॅलेस राष्ट्राला दान करण्याची विनंती करेन. मी जिवंत असताना नाही, तरी माझ्या निधनानंतर नक्कीच असे घडेल. ३. येथूनच स्त्रीमुक्ती कार्यक्रमाची पताका फडकेल. यातील पहिल्या दोन गोष्टी सत्यात उतरल्या आणि तिसरीसाठी गांधी राष्ट्रीय स्मारक समिती गेली बत्तीस वर्षे कटिबद्ध आहे. सदर पुस्तिका हा त्यातील कामाचाच एक भाग होय.