Loading

Shikshan : Parivartanachi Samajik Chalval

शिक्षण : परिवर्तनाची सामाजिक चळवळ

Author : Prof. Ramesh Panse (प्रा. रमेश पानसे)

Price: 100  ₹80

Discount: 20%

Avilability: In stock

ISBN : 8189724460
Publisher : Diamond Publications
Published on :
Binding type : Paperback
Edition : 0
Language : Marathi
Rating :

प्रबोधनाच्या चळवळीची दोन अविभाज्य अंगे आहेत. एक आहे ते वैचारिक अंग आणि दुसरे आहे ते भावनिक अंग. या दोन्हीच्या एकत्रित अस्तित्वाशिवाय प्रबोधनाची चळवळ उभीच राहू शकत नाही. एखाद्या चळवळीत, त्याचे वैचारिक अंग प्रधान असेल पण त्याला भावनिक अंग अजिबात नाही, असे असणार नाही. तर दुसर्‍या एखाद्या चळवळीत, त्याच्याप्रबोधन कार्यात भावनिक अंग प्रभावी राहील पण त्याला विचाराची जोड असावीच लागेल. आपली प्रबोधनाची चळवळ ही लहान बालकांच्या संदर्भातली चळवळ आहे. त्यामुळे भावनेच्या पातळीवर ती सर्वत्र समाजाला आपलीशी वाटणे सहज शक्य आहे. बालक, बालकाची नैसर्गीक वाढ त्या नैसर्गीक वाढीला पोषक अशी आनंददायी शिक्षणपध्दती, बालकाचे आरोग्य, बालकाचे व्यक्तीमत्व, बालकाचे भवितव्य असे बालजीवनाशी संबंधित असे सर्वच विषय समाजातील प्रत्येक घटकासच जवळचे नि महत्वाचे खासच वाटत असतात. त्यामुळे या सगळ्यांचे शास्त्र गेली दोन-तीन शतके विकसीत होत गेलेले आहे, त्याला आधुनिक मानसशास्त्राचा, शरिरशास्त्राचा नि शिक्षणशास्त्राचा बळकट आधार आहे आणि हे शास्त्र बालशाळातून सहजपणे आंमलात आणता येते, हा विचार आपण प्रभावीपणे लोकापर्यंत पोचवू शकू. उदा: आजच्या शहरी सुशिक्षित पालकांची अपेक्षा अशी असते की, मुलांचा बौध्दिक विकास लवकर व्हावा. शिक्षण म्हणजे केवळ बौध्दिकरित्या शिकणे एवढेच त्यांच्या डोळ्यसमोर असते अशावेळी आपण त्यांना जरा प्रयत्नाने पटवून देऊ शकू की, शालेयपूर्व वयातील बालकांची बौध्दिक वाढ पुढे सरकण्यापूर्वी बालकांच्या शारिरिक, मानसिक नि सामाजिक क्षमतांची काहीएक पूर्वतयारी व्हावी लागते. एवढेच नव्हे तर बौध्दिक क्षमतांच्या बरोबरीने इतरही क्षमता विकसित होत गेल्या तरच बौध्दिक विकास परिपूर्णतेने गाठता येतो.

Be the first to review


Add a review