Avilability: Out of stock
गंगेसमान निर्मळतेने कानसेनांना तृप्त करणार्या गंगुबाईंची जीवनगाथा आजच्या काळातही अवतरावी म्हणूनच हे ‘गंगावतरण’ ! गंगुबाई या प्रसिद्ध गायिका तर होत्याच पण एक व्यक्ती म्हणूनही त्या तेवढ्याच मोठ्या होत्या. याच पैलूवर या आत्मचरित्रात विशेष भर दिला आहे. एक कलाकार घडताना किती संघर्ष करावा लागतो आणि त्याचबरोबर कुठल्याही सामान्य माणसासारखं जीवनातल्या प्रत्येक सुखदु:खाला किती धीरानं सामोरं जावं लागतं याचं वर्णन अतिशय वैयक्तिक पातळीवर खुद्द गंगुबाईंशी संवाद साधून दमयंती नरेगल यांनी कन्नडमध्ये वाचकांसमोर मांडलं आहे. स्वत:च्या मातृभाषेत आपले विचार मांडताना साहजिकच त्यात आत्मीयता उतरली आहे. उत्तम गायिका म्हणून परिचित असलेल्या गंगुबाईंच्या जीवनातल्या इतर बाजू जाणून घ्यायला मराठी वाचकांनाही आवडेल म्हणून हा अनुवादाचा घाट ! ‘गंगावतरण’ वाचताना प्रत्येक संवेदनशील माणूस त्यांच्या गायनाइतकाच पूर्णपणे समरस होऊन जाईल याची खात्री वाटते.