Avilability: In stock
२००९ साली दमयंती नरेगल यांची ‘तेरनेळेय बारे तंगि’ ही मूळ कन्नडमधील कादंबरी प्रकाशित झाली. काहीच दिवसांत या कादंबरीला प्रख्यात ‘मास्ती पुरस्कार’ मिळाला आणि कादंबरीची लोकप्रियता वाढली. उत्तर कर्नाटकातील मध्यमवर्गीय कुटुंबाच्या पाच पिढ्यांतील स्त्रियांची ही कथा आहे. स्त्रीच्या दृष्टीने असणारा स्वातंत्र्यलढा, पुरुषप्रधान समाज तसेच पुरुषी अहंकाराचे वर्णन या कथेतून आपल्यासमोर येते. धारवाडी कन्नड भाषेत लोकप्रिय ठरलेल्या या कादंबरीचा हा मराठी अनुवादही रसिक वाचकांच्या पसंतीस उतरेल.