Avilability: In stock
आर्थिक सबलीकरण हा ‘बाएङ्ग’ च्या कामाचा उद्देश. राजकीय व्यवस्थेविरुद्ध आंदोलन, लढा, मोर्चा, चळवळी या संघर्षात्मक मार्गांपेक्षा सरकारी योजनांचा लाभ गरीब, आदिवासी स्त्रिया, मुलं यांच्यापर्यंत पोचवण्याचा रचनात्मक मार्ग ‘बाएङ्ग’नं स्वीकारला आहे. चळवळी, आंदोलनं कमी महत्त्वाची आहेत असं अजिबात नाही; पण पोटात भूक असेल तर डोक्यात विचार टिकत नाहीत. म्हणून आधी माणसाला उभं करणं आणि मग जागं करणं ‘बाएङ्ग’ला जास्त महत्त्वाचं वाटतं.