Avilability: In stock
स्वामी विवेकानंदांचं ‘योद्धा संन्यासी’ म्हणून बहुतांश लोकांना नाव ठाऊक असतं. स्वामी विवेकानंदांबरोबरच श्रीरामकृष्ण परमहंसांचे अन्य पंधरा अंतरंग शिष्य होते. या पंधराही जणांनी स्वामी विवेकानंदांना मनाच्या, बुद्धीच्या खोल तळापासून आपला नेता मानलं. रामकृष्ण संघाचं काम ङ्गुलवण्यात आपापलं आयुष्य देऊन टाकलं. त्या सर्वांच्या योगदानाची कल्पना मराठी वाचकांना यावी म्हणून त्यांच्या आयुष्यातील निवडक १०० प्रसंगांचं हे संकलन ! प्रसंग घडून जातात लहानशा क्षणांच्या अवधीत; पण देऊन जातात तत्त्वज्ञानाचं मर्म. हे मर्म कसं? तर जगताना आपल्यालाही नैतिक सामर्थ्य मिळवून देणारं, आयुष्याचा खरा अर्थ सांगणारं! हे सर्वजण आपल्याला चिंतनाच्या वाटेवर नेणारे सोयरेच आहेत.