गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेले विश्वास पाटील जिद्दीने शिक्षण घेत पुढे आय.ए.एस. अधिकारी बनले. अनेक ग्रंथ आणि ऐतिहासिक साधनांचा अभ्यास करून त्यांनी लिहिलेल्या पानिपत आणि संभाजी सारख्या कादंबऱ्याना वाचकांनी तुफान प्रतिसाद दिला. याबरोबरच पांगिरा, झाडाझडती आणि महानायक या त्यांच्या महत्वाच्या कादंबऱ्या आहेत. त्यांच्या अनेक पुस्तकांची इतर भारतीय भाषांमध्ये भाषांतरे झाली आहेत.